Headlines

नारळी पौर्णिमेनिमित्त मोती तलावात मानाचा सुवर्ण नारळ अर्पण

सावंतवाडी : नारळी पौर्णिमेनिमित्त सालाबादप्रमाणे येथील ऐतिहासिक मोती तलावात सावंतवाडीकरांकडून नारळ अर्पण करण्यात आला. सावंतवाडी संस्थानचे राजेसाहेब खेमसावंत भोसले व पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांच्या हस्ते मानाच्या सुवर्ण नारळाचे पूजन करून तो तलावात अर्पण करण्यात आला.

सावंतवाडी पोलीस ठाण्यातून प्रथेप्रमाणे हा नारळ वाजत गाजत मोती तलाव येथे पोहचला. यावेळी राजेसाहेब खेमसावंत भोंसले व पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांच्या हस्ते नारळाचे पूजन करण्यात आले. पूजनानंतर मानाचा सोन्याचा नारळ तलावात अर्पण करण्यात आला. यावेळी उपस्थित युवकांनी पाण्यात उडी घेत नारळ जमा केले. दरवर्षी पे‌क्षा यावर्षीचे गर्दीचे प्रमाण मात्र फार कमी दिसू़न आले. या सोहळ्यास सावंतवाडी संस्थानचे राजे खेमसावंत भोसले, पोलिस निरीक्षक राजेंद्र मगदूम, युवराज लखमराजे भोंसले, नगराध्यक्षा श्रद्धाराजे भोंसले, सभापती आनंद नेवगी, सुधीर आडीवरेकर, माजी नगरसेवक सुरेंद्र बांदेकर, दिलीप भालेकर, काका मांजरेकर, कृष्णा राऊळ,श्री. गवस, पोलीस श्री‌. धोत्रे, आबा पिळणकर, श्री. लोंढे आदींसह नागरिक उपस्थित होते.

You cannot copy content of this page