Headlines

जिल्हास्तरीय बुदधिबळ स्पर्धेत मुक्ताई ॲकेडमीचे विघ्नेश, प्रज्वल, मोहिशा, यश, अथर्व विजेते…

⚡सावंतवाडी ता.२७-: मुक्ताई ॲकेडमीच्या विदयार्थ्यांनी वेंगुर्ला येथील कै.महेश परब स्मृती चषक जिल्हास्तरीय बुदधिबळ स्पर्धेत चमकदार कामगिरी करत दहा आणि तेरा वर्षाखालील वयोगटात पाच पारितोषिके पटकावली. सावंतवाडी, कुडाळ, वेंगुर्ला, मालवण आणि देवगड येथील मुक्ताई ॲकेडमीच्या सत्तावीस विदयार्थ्यांनी स्पर्धेत सहभाग घेऊन उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले. दहा वर्षाखालील वयोगटात विघ्नेश अंबापूरकर याने दूसरा, प्रज्वल नार्वेकर याने चौथा आणि मोहिशा जाधव हिने पाचवा क्रमांक मिळवला.

तेरा वर्षाखालील वयोगटात यश सावंत याने तिसरा आणि अथर्व वेंगुर्लेकर याने पाचवा क्रमांक मिळवला. विजेत्या विदयार्थ्यांना रोख पारितोषिक, चषक आणि प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.
विशेष म्हणजे स्पर्धेतील सर्वात लहान मुलगी सावंतवाडीची सहा वर्षाची दिव्यांका नार्वेकर आणि लहान मुलगा देवगडचा आकाश वाटवे यांनी सहा राऊंड्समध्ये साडेतीन गुण केले. या मुलांप्रमाणेच सावंतवाडी, कुडाळ, वेंगुर्ला, मालवण आणि देवगड येथील सहभागी विदयार्थ्यांनी स्पर्धेत चांगली कामगिरी केल्यामुळे त्यांना प्रोत्साहनपर पारितोषिक मेडल आणि प्रशस्तीपत्र देण्यात आले. यावेळी विदयार्थ्यांसोबत प्रशिक्षक आणि राज्य पंच बाळकृष्ण पेडणेकर आणि मुक्ताई ॲकेडमीचे अध्यक्ष, ज्येष्ठ प्रशिक्षक श्री.कौस्तुभ पेडणेकर सर उपस्थित होते. सर्व स्तरातून यशस्वी विदयार्थ्यांचे कौतुक करण्यात येत आहे.

You cannot copy content of this page