शितल मांजरेकर:गांगो मंदिर परिसरातील सोलार हायमास्टसाठी केलेल्या मागणीला यश:नगराध्यक्ष संदेश पारकर यांच्या माध्यमातून मंजुरी..
⚡कणकवली ता.२७-: कणकवली नगरपंचायतीच्या प्रभाग क्रमांक १० मधील गांगो मंदिर परिसरात सोलार हायमास्ट बसविण्याची मागणी आपण केली होती. या मागणीसाठी प्रदीप मांजरेकर, जय शेटये, रामदास मांजरेकर आणि सुजित जाधव यांनी सातत्याने पाठपुरावा केला. या पाठपुराव्याची दखल घेत नगराध्यक्ष संदेश पारकर यांच्या माध्यमातून महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान (जिल्हास्तर) योजनेतून गांगो मंदिर परिसरात सोलार हायमास्ट मंजूर झाला. आता हा हायमास्ट कार्यान्वित झाल्याने परिसर प्रकाशमय झाला आहे.
याबाबत शीतल मांजरेकर यांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे. ऱ्या म्हणाल्या की, गांगो मंदिर परिसरात हायमास्टची आवश्यकता लक्षात घेऊन मी ही मागणी केली होती. या मागणीसाठी प्रदीप मांजरेकर, जय शेटये, रामदास मांजरेकर आणि सुजित जाधव यांनी सातत्याने पाठपुरावा केला. नगराध्यक्ष संदेश पारकर यांच्या माध्यमातून महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियानातून हा हायमास्ट मंजूर झाला. त्यामुळे या कामाचे श्रेय ज्यांनी प्रत्यक्ष मागणी केली आणि त्यासाठी पाठपुरावा केला, त्यांचेच आहे. विरोधकांनी या हायमास्टच्या मंजुरीचे श्रेय घेऊ नये.
हायमास्ट मंजूर करून दिल्याबद्दल नगराध्यक्ष संदेश पारकर यांचे त्यांनी आभार मानले. गंगोमंदिर परिसरात प्रकाशाची सुविधा उपलब्ध झाल्यामुळे नागरिकांना मोठा फायदा झाला आहे. मात्र, आम्ही केलेल्या मागणी व पाठपुराव्यामुळे मंजूर झालेल्या या कामाचे श्रेय दुसऱ्यांनी घेण्याचा प्रयत्न करू नये, असेही शितल मांजरेकर यांनी स्पष्ट केले.
गांगो मंदिर परिसरात सोलार हायमास्ट कार्यान्वित झाल्यामुळे रात्रीच्या वेळी नागरिकांना तसेच मंदिर परिसरात येणाऱ्या भाविकांना प्रकाशाची सुविधा उपलब्ध झाली असून, या कामाबद्दल परिसरातून समाधान व्यक्त होत आहे.
