आमदार दीपक केसरकर:’सावंतवाडीत टक्केवारीची परंपरा नाही’; नगरपरिषदेच्या आरोपांवर केसरकरांचे स्पष्टीकरण..
⚡सावंतवाडी ता.१३- : शिवसेना आमदार निलेश राणे यांनी सभागृहात आंबा, काजू शेतकऱ्यांसह दशावतार कलावंतांचे चांगले मुद्दे मांडत त्यांना न्याय मिळवून दिला अशा शब्दांत माजी मंत्री, आमदार दीपक केसरकर यांनी त्यांचे कौतुक केले. तसेच माजी खासदार विनायक राऊत यांच्यासह कुटुंबावर एखादी महिला आरोप करते त्यावेळी तीला न्याय मिळण आवश्यक आहे. घरगुती विषय असल्याने मी अधिक बोलणार नाही. मात्र, पोलिस त्या महिलेला न्याय देतील, तीला न्याय देणं आवश्यक आहे अशी प्रतिक्रिया श्री. केसरकर यांनी दिली.
तसेच नगरपरिषदेवर होणाऱ्या आरोपांवर त्यांना विचारलं असता, आरोप झाल्यानंतर त्यातील तथ्य तपासून बघण आवश्यक आहे. सावंतवाडीत ठेकेदाराला कुणाला पैसे द्यावे लागत नाही, अशी परंपरा आहे. त्यामुळे कामात त्रुटी राहू शकतील. पण, भ्रष्टाचार होईल अस वाटत नाही. टक्केवारीवरून सावंतवाडीवर आरोप होण योग्य नाही. अशी संधी कुणाला मिळू नयेत हीच अपेक्षा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तर सगळ्या नगरसेवकांना बैठकीस बोलवण आवश्यक होतं. मात्र, निरोप न मिळाल्यास त्यांनाही विश्वासात घेतलं जाईल. तसेच दोडामार्ग सासोलीतील पंप गृहाला पर्यायी व्यवस्था देण्याबाबत आमचा विचार आहे. नवीन होणाऱ्या सब स्टेशनच्या माध्यमातून तिथे पर्यायी वीज उपलब्ध करून देण्यावर माझा भर राहील. तिलारीच्या या पाण्याच्या माध्यमातून १९ गावांना पाणी पुरवठा होतो. त्यामुळे लक्ष दिलं जाईल तसेच घारपीलाही विद्युत पुरवठा करण्यासाठी कार्यवाही सुरू आहे. याबाबतचा आढावा घेण्यासाठी पुन्हा एकदा महावितरणशी बैठक घेतली जाईल , अशी माहिती श्री. केसरकर यांनी दिली.
