Headlines

वादळी वाऱ्याने बाधित भाजपच्या माजी बूथ अध्यक्षांना विशाल परब यांची आर्थिक मदत ..

आरवली येथे नुकसानग्रस्त साळगांवकर कुटुंबाची घेतली भेट; भाजप कार्यकर्त्यांच्या पाठीशी ठाम असल्याची ग्वाही..

⚡वेंगुर्ला, ता. १३-: आरवली येथे अलीकडे झालेल्या वादळी वाऱ्यामुळे भारतीय जनता पक्षाचे माजी बूथ अध्यक्ष एकनाथ साळगांवकर यांच्या नव्याने बांधलेल्या राहत्या घरावरील पत्रे उडून मोठे नुकसान झाले. या घटनेची माहिती मिळताच भाजप युवा नेते विशाल परब यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली आणि साळगांवकर कुटुंबाला आर्थिक मदत देत दिलासा दिला.

यावेळी विशाल परब यांनी साळगांवकर कुटुंबीयांची विचारपूस केली. नैसर्गिक आपत्तीच्या काळात भारतीय जनता पक्ष आपल्या कार्यकर्त्यांच्या तसेच नागरिकांच्या पाठीशी खंबीरपणे उभा असल्याची ग्वाही त्यांनी दिली.

या प्रसंगी आरवलीचे सरपंच समीर कांबळी, उपसरपंच किरण पालयेकर, सागरतीर्थचे सरपंच एकनाथ कुडव, आरवलीचे माजी सरपंच तातोबा कुडव, शिरोड्याचे माजी सरपंच मनोज उगवेकर तसेच भाजपचे ज्येष्ठ कार्यकर्ते लक्ष्मीकांत कर्पे, शेखर गोडकर, महादेव नाईक, मिलिंद साळगांवकर आणि तुषार रगजी उपस्थित होते.

नैसर्गिक आपत्तीमुळे अडचणीत सापडलेल्या नागरिकांना वेळोवेळी मदत करण्याची भूमिका विशाल परब सातत्याने निभावत असून, त्यांच्या या मदतीमुळे साळगांवकर कुटुंबाला मोठा दिलासा मिळाल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

You cannot copy content of this page