Headlines

गितेश राऊत यांच्यावर झालेल्या आरोपांची पोलिसांनी कसून चौकशी करावी…

अँड.निता सावंत कविटकर :गिरीजा राऊत यांना न्याय मिळेपर्यंत शिंदे शिवसेना त्यांच्या पाठीशी; गरज पडल्यास रस्त्यावर उतरून आंदोलन करू..

⚡सावंतवाडी, ता. १३ -: गितेश राऊत यांच्यावर करण्यात आलेल्या आरोपांची पोलिस प्रशासनाने निष्पक्ष व सखोल चौकशी करावी. चौकशीत दोषी आढळल्यास त्यांच्यावर कायद्यानुसार कठोर कारवाई करून कडक शिक्षा करण्यात यावी, अशी मागणी शिंदे शिवसेनेच्या जिल्हाप्रमुख अॅड. नीता सावंत-कविटकर यांनी केली.

यावेळी त्या म्हणाल्या की, गिरीजा राऊत यांना न्याय मिळवून देण्यासाठी शिंदे शिवसेना व महिला आघाडी त्यांच्या ठाम पाठीशी उभी आहे. या प्रकरणात कोणावरही अन्याय होऊ नये आणि सत्य समोर यावे, यासाठी पोलिसांनी निष्पक्ष चौकशी करणे आवश्यक आहे.गिरीजा राऊत यांना न्याय मिळेपर्यंत शिंदे शिवसेना शांत बसणार नाही. आवश्यकता भासल्यास रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही अॅड. नीता सावंत-कविटकर यांनी दिला.

You cannot copy content of this page