Headlines

वेंगुर्ला येथे उद्या ‘गुणवंत विद्यार्थी सन्मान व शिक्षक गौरव’

कोकण शिक्षक मतदारसंघाचे आ. ज्ञानेश्वर म्हात्रे, विशाल परब यांची प्रमुख उपस्थिती

वेंगुर्ला
कोकण कला व शिक्षण विकास संस्था, वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग, तुळस आणि विशाल परब मित्रमंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवार दि. १४ जुलै रोजी दुपारी २.३० वाजता स्वामिनी मंगल कार्यालय वेंगुर्ला येथे
‘गुणवंत विद्यार्थी सन्मान व शिक्षक गौरव सोहळा २०२६’ आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्यामध्ये इयत्ता ५ वी व ८ वी शिष्यवृत्ती परीक्षा तसेच दहावी व बारावी बोर्ड परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या वेंगुर्ला तालुक्यातील प्रत्येक शाळेतील प्रथम तीन क्रमांक प्राप्त गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात येणार असून शंभर टक्के निकालाची परंपरा कायम राखणाऱ्या शाळांचे मुख्याध्यापक, प्राचार्य आणि शिक्षक यांचाही विशेष सन्मान करण्यात येणार आहे.आजच्या स्पर्धात्मक युगात विद्यार्थ्यांना अधिकाधिक प्रोत्साहन मिळावे, त्यांच्या यशाचा गौरव व्हावा आणि इतर विद्यार्थ्यांसमोर प्रेरणादायी आदर्श निर्माण व्हावा, या उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय यश मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांच्या कर्तृत्वाचा सन्मान करून त्यांना भविष्यातील वाटचालीसाठी प्रेरणा देण्याचा प्रयत्न या माध्यमातून करण्यात येणार आहे.या कार्यक्रमाला कोकण शिक्षक मतदारसंघाचे आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांची प्रमुख उपस्थिती लाभणार असून युवा नेते तथा भाजप पदाधिकारी विशाल परब हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. तसेच कोकण कला व शिक्षण विकास संस्थेचे अध्यक्ष दयानंद कुबल यांच्यासह शिक्षण, सामाजिक आणि विविध क्षेत्रांतील मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे.
विद्यार्थ्यांच्या कर्तृत्वाचा गौरव आणि शिक्षकांच्या योगदानाचा सन्मान करून शिक्षण क्षेत्रात सकारात्मक वातावरण निर्माण करणे, हा या उपक्रमामागील प्रमुख हेतू आहे.या कार्यक्रमास गुणवंत विद्यार्थी, पालक, शिक्षक, मुख्याध्यापक, प्राचार्य, शिक्षणप्रेमी नागरिक तसेच समाजातील विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग, तुळसचे अध्यक्ष डॉ. सचिन परुळकर आणि कोकण कला व शिक्षण विकास संस्थेचे अध्यक्ष दयानंद कुबल यांनी केले आहे.

You cannot copy content of this page