वैभववाडी व्यापारी संघटनेचे बँकांना निवेदन…
वैभववाडी प्रतिनिधी
वैभववाडी तालुका व्यापारी संघटनेच्या वतीने तालुक्यातील सर्व बँकेत जाऊन वैभववाडी तालुक्यातील सर्व व्यापाऱ्यांना सुट्टी पैसे मिळावे अशी मागणी करत निवेदन देण्यात आले.
वैभववाडी बाजारपेठेत व्यापाऱ्यांना सुट्या पैशाची चंचल बसत असल्याचे व्यापाऱ्यांमधून बोलले जात होते त्यामुळे सोमवारी तालुका व्यापारी संघाच्यावतीने तालुक्यातील भारतीय स्टेट बँक बँक ऑफ इंडिया बँक ऑफ महाराष्ट्र सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँक व सारस्वत बँक आधी बँकांमध्ये जाऊन संघाच्यावतीने व्यापाऱ्यांना सुट्टी पैसे मिळावे अशी मागणी केली
यावेळी महासंघाचे जिल्हा अध्यक्ष श्री. संजय सावंत. तालुका अध्यक्ष श्री. तेजस आंबेकर. उपाध्यक्ष अरविंद गाड, कार्यकारिणी सदस्य रवींद्र पाटील, वसंत पटेल, सुरेंद्र नारकर, मनोज सावंत,संतोष कुडाळकर आदी उपस्थित होते.
