माझ्या राजीनाम्याने मराठा आरक्षण मिळत असेल तर नक्कीच राजीनामा देईन

*छत्रपती संभाजी राजे यांचे मालवणमध्ये स्पष्टीकरण*

*💫मालवण दि.३१-:* राज्यसभेचे खासदार छत्रपती संभाजी राजे हे आज मालवण दौऱ्यावर आले असता त्यांनी राजीनामा देणार असल्याचे वृत्त फेटाळून लावले पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले मराठा आरक्षणावर आपण आपली भूमिका यापूर्वी स्पष्ट केली असून, आपण राजीनामा दिल्याने आरक्षण मिळणार नाही. आणि जर आपण राजीनामा देऊन आरक्षण मिळणार असेल तर नक्कीच राजीनामा देईन असे सांगत. राज्यात छत्रपती संभाजी राजे यांच्या राजीनाम्याबाबत सुरू असलेल्या उलट सुलट चर्चांना पूर्णविराम दिला आहे.खासदार छत्रपती संभाजी राजे हे आज सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्याचा दौरा केला त्यावेळी ते बोलत होते

You cannot copy content of this page