खा नारायण राणेंच्या हस्ते कोरोना यौध्यांचा सत्कार

मोदींच्या सप्तपुर्ती निमित्त सावंतवाडी भाजपाचे आयोजन

*💫सावंतवाडी दि.३०-:* केंद्रातील भाजप सरकारला आज सात वर्ष पूर्ण झाली असून, त्यानिमित्त सावंतवाडी भाजपच्या वतीने माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे यांच्या हस्ते कोरोना योद्धांचा सत्कार करण्यात आला आहे. सावंतवाडी येथील काझी शहाबुद्दीन हॉलमध्ये आज रविवार दि. ३० मे रोजी हा सत्कार सोहळा पार पडला आहे. यावेळी माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या हस्ते सावंतवाडील डाॅ. शंतनू तेंडुलकर, डाॅ. अभिजीत चितारी, डाॅ. मुरली, डाॅ. साईनाथ पित्रे, डाॅ. राजेश नवांगुळ, डाॅ. संध्या विर्नोडकर यांच्यासह पालिकेच्या आरोग्य कर्मचारी वर्गाचा आणि सामाजिक कार्यकर्त्याचा सत्कार करण्यात आला. यावेळी नगराध्यक्ष संजू परब, भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली, शहराध्यक्ष अजय गोंदावळे, नगरसेवक आनंद नेवगी, मनोज नाईक, परिमल नाईक, उदय नाईक, संदिप कुडतरकर, राजू बेग, दिलीप भालेकर आदी मान्यवर उपस्थित होते.

You cannot copy content of this page