*मातृत्व आधार फाऊंडेशन मालवणच्या वतीने सिंधुदुर्ग किल्ला स्वच्छ

*फाऊंडेशनच्या माध्यमातून राबवण्यात आली होती स्वच्छता मोहीम

*💫मालवण दि.०२-:* मातृत्व आधार फाउंडेशन मालवण या सामाजिक संस्थेच्या वतीने सिंधुदुर्ग किल्यामध्ये स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. किल्ल्यात मोठ्या प्रमाणावर वाढलेली झाडी तोडून तसेच इतर कचऱ्याची साफसफाई करून त्याची विल्हेवाट लावण्यात आली. या मोहिमेत संस्थेच्या पदाधिकारी, बहुसंख्य सदस्यांसह कातकरी समाजातील कामगार सहभागी झाले होते. मातृत्व आधार फाऊंडेशन मालवण या सामाजिक संस्थेतर्फे सिंधुदुर्ग किल्ल्यात नियोजनबद्ध स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत संस्थेचे अध्यक्ष आप्पा चव्हाण, संस्थापक संतोष लुडबे, संचालक दामोदर तोडणकर, संतोष चव्हाण, विश्वास गांवकर, संजय (बंटी) वराडकर, प्रसाद भोजने, तपस्वी मयेकर, तसेच सदस्य दादा वेंगुर्लेकर, मिलिंद झाड,संतोष नागवेकर, रावजी (दादा) लुडबे, रविंद्र परदेशी, संदीप नेवाळकर, दिपक कुडाळकर, सहदेव (बाबू) लुडबे, सिद्धार्थ लुडबे, शिवा जाधव, जगदीश तोडणकर, सौ.श्रमिका (उमा) संतोष लुडबे, वैभवी नरे, रविना लुडबे, पुष्पलता लुडबे, ज्योती तोडणकर, कु. दिक्षा संतोष लुडबे, दिव्या जगदिश तोडणकर, राजू मोरजकर, जगदिश तोडणकर, साईनाथ मालवणकर, सचिन मालवणकर, संदीप लुडबे, विजय गांवकर, बिरु झोरे, ज्योती तोडणकर, लवू माडये, सिध्दार्थ लुडबे, तसेच वायरी भुतनाथ ग्रामपंचायत कर्मचारी जितेंद्र मायबा, जयप्रकाश बोडवे, दत्ताराम मालवणकर, मालवण नगरपरिषदेचे कर्मचारी भूषण जाधव, अर्जुन कदम आणि कातकरी समाजाचे ३४ कामगार सहभागी झाले होते. संस्थेच्या या उपक्रमास संचालक श्री. दामोदर तोडणकर, व सयाजी सकपाळ यांनी मोफत वाहतुक सेवा तसेच मालवण नगरपरिषदेच्या वतीने नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनी दोन कर्मचारी व दोन ग्रासकटींग मशीन, वायरी भूतनाथ ग्रामपंचायतीच्या वतीने सरपंचांनी तीन कर्मचारी व ग्रासकटींग संस्थेच्या मागणीप्रमाणे देवून सहकार्य केले. सिंधुदुर्ग किल्ल्यात राबविलेल्या या स्वच्छता मोहीमेबद्दल किल्ल्यातील श्री देवी भवानी मंदिराचे मानकरी व रहिवासी श्री. सयाजी सकपाळ व श्री. विद्याधर पाडावे यांनी सर्वाचे आभार मानले.

You cannot copy content of this page