⚡मालवण ता.०५-:
उत्तर विभाग शिक्षण साहाय्यक समिती संचालित ओझर विद्यामंदिर, कांदळगाव या प्रशालेमध्ये जागतिक पर्यावरण दिन उत्साहात संपन्न झाला. जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने प्रशालेच्या विद्यार्थ्यांमार्फत ओझर विद्यामंदिर परिसरात वृक्ष लागवड करण्यात आली. वृक्ष लागवडीनंतर विद्यार्थ्यांनी काही वृक्षांना फुले व पुष्पहार घालून वृक्षांच्याप्रति कृतज्ञता व्यक्त केली.
प्रशालेतील इयत्ता दहावीचे विद्यार्थी ओंकार राणे, केदार चव्हाण, विघ्नेश कुंभार, गौरव धुरी, रिद्धी कदम, अमृता बागवे, हर्षाली लाड, स्वप्नाली सुर्वे व भक्ती तेली यांनी वृक्ष लागवडीसाठी श्रमदान केले. वृक्ष लागवडीनंतर ओझर विद्यामंदिरचे प्रभारी मुख्याध्यापक डी. डी. जाधव यांनी जागतिक पर्यावरण दिन व वृक्ष लागवडीचे महत्त्व विद्यार्थ्यांना सांगितले.
या कार्यक्रमाप्रसंगी ओझर विद्यामंदिर कांदळगाव प्रशालेच्या शालेय समितीचे अध्यक्ष किशोर नरे, सदस्य विजय कांबळी व जयराम कांबळी तसेच शाळेच्या हरित सेना विभागाचे प्रमुख शिक्षक प्रवीण पारकर, ए. ए. शेर्लेकर व शिक्षकेतर कर्मचारी रविराज जाधव आणि मधुसुदन परुळेकर हे उपस्थित होते. या उपक्रमाबद्दल शालेय समितीचे अध्यक्ष किशोर नरे यांनी विद्यार्थी व शिक्षक यांचे कौतुक केले.
