सीएनजीसाठी मुख्य रस्त्यावर गर्दीमुळे वाहतूक समस्या कायम..
⚡वेंगुर्ला ता.२३-: पेट्रोल डिझेलचे दर सलग तिसऱ्यांदा वाढले असतानाच वाहनधारकांना वेंगुर्ला शहरात भटवाडी येथे असलेल्या पेट्रोलपंपावर शुक्रवारपासून पेट्रोल डिझेल साठा संपल्याने
नाहक भुर्दंड सोसावा लागत आहे. त्यामुळे शासनाच्या कारभाराविरोधात वाहनधारकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. मात्र वेंगुर्ला भटवाडी येथे पॉवर पेट्रोल (120 रुपये दर ) उपलब्ध ठेवण्यात आले आहे. त्यामुळे नागरिकांना अधिक 10 रुपयांचा अनावश्यक भुर्दंड सोसावा लागत आहे. दरम्यान मठ येथील पेट्रोलपम्प येथे पेट्रोल 110 रुपये पार व डिझेल 97 रुपयाने उपलब्ध असल्याने वाहनधारकांतून समाधान व्यक्त करण्यात आले आहे. दरम्यान वेंगुर्ला भटवाडी येथे सीएनजी साठी मुख्य रस्त्यावर वाहने पार्क होत असल्याने अन्य वाहनधारकांना त्रास सहन करावा लागत आहे. संबंधित व्यवस्थापनाने दोन रांगामध्ये ही व्यवस्था करावी, अशी मागणी वाहनधारकांतून करण्यात आली आहे.
