⚡देवगड ता.२१-:
मालवण-दांडी परिसरातील सेवाभावी वृत्तीने परिचित असलेले सेवानिवृत्त माजी नायब तहसीलदार गोविंद रामचंद्र कुमठेकर यांचे गुरुवारी (दि. २१ मे) अल्प आजाराने निधन झाले. ते ८० वर्षांचे होते.त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, सुना व नातवंडे असा परिवार आहे. दांडी येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
महसूल खात्यात तलाठी म्हणून सेवेला सुरुवात करून त्यांनी बुधवळे, काळसे, धामापूर, फोंडा, हडी आदी ठिकाणी काम पाहिले. पुढे मंडल अधिकारी तसेच मालवण येथे नायब तहसीलदार म्हणून त्यांनी जबाबदारी सांभाळली. पुरवठा निरीक्षण अधिकारी पदावरून ते सेवानिवृत्त झाले होते.
सेवानिवृत्तीनंतरही अनेकांच्या अडचणी सोडवत सामाजिक कार्यात सक्रिय राहिल्याने ते “बाबी कुमठेकर” या नावाने परिचित होते.
