सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस अध्यक्षपदी अरविंद मोंडकर यांची निवड…

⚡मालवण ता.२१-:
अखिल भारतीय काँग्रेस पक्षाच्या महाराष्ट्रातील संघटनात्मक फेररचनेत सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस अध्यक्षपदी अरविंद नामदेव मोंडकर यांची निवड करण्यात आली आहे. अखिल भारतीय काँग्रेस समितीचे सरचिटणीस के. सी . वेणूगोपालन यांनी याबाबत प्रसिद्धीपत्रक जारी केले.

महाराष्ट्रातील संघटन अधिक मजबूत करण्याच्या उद्देशाने जिल्हा काँग्रेस समित्यांची पुनर्रचना करण्यात आली असून, त्याअंतर्गत विविध जिल्हाध्यक्षांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत. या यादीमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी अरविंद मोंडकर यांच्या नावाची घोषणा करण्यात आली.

ही नियुक्ती “संगठन सृजन अभियान” अंतर्गत करण्यात आली असून, जिल्हानिहाय आढावा, पक्ष कार्यकर्त्यांशी संवाद आणि वरिष्ठ नेत्यांच्या चर्चेनंतर अंतिम निर्णय घेण्यात आल्याचे प्रसिद्धीपत्रकात नमूद करण्यात आले आहे.

लोकशाही आणि संविधान मजबूत करण्यासाठी सर्वमान्य असे गांधी – नेहरू यांचे विचार दृढ करण्यासाठी आणि महाराष्ट्राचा पुरोगामी वारसा जपण्यासाठी येणाऱ्या काळात अधिक जोमाने काम करण्याची संधी पक्ष नेतृत्वाने मला दिली आहे. तसेच जिल्ह्यातील पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी माझ्यावर विश्वास दाखवला यासाठी सर्वांचे आभार मानत असून आता सिंधुदुर्ग जिल्ह्य काँग्रेसमय करण्याचा माझा प्रयत्न राहील, असे अरविंद मोंडकर यांनी म्हटले आहे.

अरविंद मोंडकर यांच्या निवडीमुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात काँग्रेस पक्षाचे संघटन अधिक बळकट होईल, असा विश्वास पक्ष कार्यकर्त्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

You cannot copy content of this page