सावंतवाडी तालुका काँग्रेसकडून राजीव गांधी यांना अभिवादन…

⚡सावंतवाडी, ता.२१ -: भारताचे माजी पंतप्रधान स्वर्गीय राजीव गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त सावंतवाडी तालुका काँग्रेसच्या वतीने आज काँग्रेस कार्यालयात त्यांना भावपूर्ण आदरांजली व पुष्पांजली वाहण्यात आली. २१ मे १९९१ रोजी झालेल्या त्यांच्या आकस्मिक निधनाने देशाचे आणि काँग्रेस पक्षाचे कधीही न भरून निघणारे नुकसान झाले, अशा भावना यावेळी कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या.

राजीव गांधी यांनी आपल्या पंतप्रधानपदाच्या कार्यकाळात देशात माहिती तंत्रज्ञान व दूरसंचार क्रांती घडवून आणली. १८ वर्षांवरील युवकांना मतदानाचा अधिकार देत लोकशाही अधिक बळकट केली तसेच पंचायत राज व्यवस्था मजबूत करून आधुनिक भारताचा पाया रचला, असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले. त्यांच्या ऐतिहासिक विकासकामांचे स्मरण करून उपस्थितांनी त्यांना अभिवादन केले.

यावेळी सावंतवाडी तालुका काँग्रेस अध्यक्ष अभय मालवणकर, प्रांतिक सदस्य दिलीप नावेकर, राजू मसुरकर, सुभाष नाईक, बाब्या म्हापसेकर, सुधीर मल्हार, आनंद आयरे, कौस्तुभ पेडणेकर, संजय लाड, बाळा नमशी पीटर फर्नांडिस, इनास माडतीस, प्रज्ञा चोगुले आदी काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

You cannot copy content of this page