⚡वेंगुर्ला ता.२०-:
सामाजिक वनीकरण वृत्त ठाणे, विभाग सिंधुदुर्ग यांच्यामार्फत कृषी वानिकी अंतर्गत प्रादेशिक फळ संशोधन केंद्र वेंगुर्ला येथे
महाराष्ट्र राज्य पुणे
सामाजिक वनीकरण विभाग,
प्रधान मुख्य वनसंरक्षक
विवेक खांडेकर (भा.व. से.) यांनी वेंगुर्ला तालुक्यातील आसोली, अणसुर, पाल, इत्यादी गावातील सुरंगी उत्पादक शेतकरी यांना मार्गदर्शन केले व शेतकऱ्याशी संवाद साधला. यावेळी सुरंगी झाडाची उत्पत्ती कशी होते, सुरंगी झाडाचे सरासरी आयुष्यमान किती, सुरंगीपासून उत्पादित होणाऱ्या मालाची साठवणूक करताना येणाऱ्या समस्या, तसेच सदर सुरांगी झाडाचे संवर्धनाच्या दुष्टीने शेतकऱ्यांच्या शासनाकडून काय अपेक्षा आहेत हे जाणून घेतले. यावेळी प्रदीपा के -(भा.व. से.)मुख्य वनसंरक्षक सामाजिक वनीकरण वृत्त ठाणे, राजेंद्र मगदूम – विभागीय वनअधिकारी विभाग सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्याचे विभागीय वनअधिकारी रणजीत गायकवाड, उभादांडा जिल्हा परिषद सदस्य संजय गावडे,
प्रादेशिक फळ संशोधन केंद्र वेंगुर्लाचे सहयोगी संशोधन संचालक डॉ. वैभव शिंदे,
बॅ. बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालय वेंगुर्लाचे
प्राचार्य डॉ. धनराज गोस्वामी,
वनस्पतीशास्त्र विभाग प्रमुख
डॉ. धनश्री पाटील,
शिवाजी युनिव्हर्सिटी कोल्हापूर चे डॉ. मानसिंग राजे निंबाळकर, सा.व. कुडाळ वनक्षेत्रपाल अतिरिक्त कार्यभार सहा. वनसंरक्षक सामाजिक वनीकरण विभाग सिंधुदुर्ग चे अतुल वाळके,
सा. व. वेंगुर्ला वनक्षेत्रपाल
स्नेहा मुरकुटे, मुळदे रोपवाटिका वनक्षेत्रपाल
शकील मुजावर, सामाजिक वनीकरण कणकवली
वनक्षेत्रपाल सदाशिव देसाई, सा. व. वेंगुर्ला वनपाल श्रेया परब, तसेच इतर वनकर्मचारी उपस्थित होते. यावेळी रिया धुरी, तुकाराम कोंबे (रा. आसोली) या शेतकऱ्यांनी आपले प्रश्न मांडले. तसेच आसोली गावातील सुरंगी उत्पादक शेतकरी तुकाराम कोंबे यांच्या सुरंगी राई ला वन अधिकारी यांनी भेट देऊन अधिक माहिती घेतली.
वेंगुर्ला येथे सिंधुदुर्गसामाजिक वनीकरण विभागमार्फतसुरंगी उत्पादक शेतकऱ्यांना मार्गदर्शन संपन्न…
