मठ एरियातील दुसऱ्या बाजूच्या साईडपट्टीचे काम त्वरित करण्यात यावे…

सरपंचा रुपाली नाईक यांची सा. बां. विभागाकडे मागणी.

⚡वेंगुर्ला ता.२१-: वेंगुर्ला मठमार्गे सावंतवाडी – कुडाळ हा महत्वाचा मार्ग आहे. या रस्त्याच्या एका बाजूचे साईडपट्टीचेही काम करण्यात यावे, अशी मागणी मठ सरपंचा सौ. रुपाली अजित नाईक यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे केली आहे. मठ कुडाळतिठा ते टाकयेवाडी पर्यंत सुमारे चार ते पाच किमी एरियातील वेंगुर्लाकडे जाणाऱ्या बाजूची साईडपट्टी सुरळीत नसल्याने पावसाळ्यात मोठ्या समस्या निर्माण होतात. याच एरियात साईडपट्टी भराव न केल्याने व रस्त्याच्या कडेला आठ ते दहा धोकादायक स्पॉट असून ‘जीवितहानी’ होऊ शकते अशी स्थिती आहे. पावसाळ्यापूर्वी त्वरित लक्ष घातल्यास हे साईडपट्टी भरावाचे काम करणे शक्य आहे. त्यामुळे याबाबत संबंधित विभागाने तातडीने पाहणी करून हे काम तातडीने मार्गी लावावे, अशी मागणी रुपाली नाईक यांनी केली आहे.दरम्यान जनतेच्या मागणीनुसार भाजपचे पदाधिकारी अजित नाईक यांनी तातडीने दखल घेत सा. बा. मार्फत दुसऱ्या बाजूचे काम सुरु असल्याने समाधान व्यक्त होत आहे.

You cannot copy content of this page