मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान’ मध्ये “अणसूर” ग्रामपंचायत तालुक्यात प्रथम…

पेंडुर ग्रा. पं. द्वितीय ; परुळेबाजार ग्रा. पं. तृतीय..

⚡वेंगुर्ला ता.२०-: ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान’ अंतर्गत वेंगुर्ला तालुक्यातील अणसूर ग्रामपंचायतीने तालुकास्तरीय स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकाविला आहे. हे यश अणसूरच्या सामूहिक एकतेचे आणि कष्टाचे फळ आहे, अशी प्रतिक्रिया अणसूर सरपंच सत्यविजय गावडे यांनी दिली आहे. या मोहिमेत गटविकास अधिकारी वासुदेव नाईक, सहाय्यक गटविकास अधिकारी दिनेश पाटकर ,ग्रामपंचायत विस्तार अधिकारी गुरुनाथ धुरी,
कृषी अधिकारी प्रशांत चव्हाण, विस्तार अधिकारी व पंचायत समितीचे सर्व वरिष्ठ अधिकारी, ग्रामपंचायत अधिकारी सायली सातोसे, उपसरपंच वैभवी मालवणकर, सर्व ग्रामपंचायत सदस्य, ग्रामपंचायत कर्मचारी व केंद्र चालक, शिक्षकवर्ग, आरोग्य, महसूल व कृषी विभाग, अंगणवाडी सेविका, मदतनीस, महिला बचत गट (CRP) आणि डिजिटल सहकार्य करणारे तरुणमित्र तन्वी, चिन्या, सिद्धेश गावडे,
सर्वात महत्त्वाचे म्हणजे, लोकसहभाग व लोकवर्गणीतून मदत करणारे आणि प्रशासनाला खंबीर साथ देणारे ग्रामस्थ यांच्या अखंड सहकार्यामुळे हा बहुमान ग्रामपंचायतिला प्राप्त झाला आहे, असे यावेळी सरपंच सत्यविजय गावडे यांनी सांगितले. या अभियानात तालुक्यातील एकूण 6 ग्रामपंचायती सहभागी होत्या. या सर्व ग्रामपंचायतींचे नुकतेच वरिष्ठ समितीमार्फत मूल्यमापन झाले होते. या अभियानात पेंडुर ग्रामपंचायतीने द्वितीय, परुळेबाजार ग्रामपंचायतीने तृतीय क्रमांक प्राप्त केला आहे. तर मेढा ग्रामपंचायत व पालकरवाडी ग्रामपंचायतीला उत्तेजनार्थ क्रमांक प्राप्त झाले आहेत. यश मिळविलेल्या सर्व ग्रामपंचायतीचे सभापती शंकर घारे, उपसभापती सचिन देसाई, जि. प. शिक्षण व आरोग्य सभापती प्रितेश राऊळ तसेच सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना देसाई, भाजपा तालुकाध्यक्ष विष्णू उर्फ पप्पू परब, शिवसेना जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर, उभादांडा जि. प. सदस्य संजय गावडे यांनी अभिनंदन केले आहे.

You cannot copy content of this page