वेंगुर्ला भाजपच्या दणक्यानंतर वीज वितरण मार्फत वर्किंग त्वरित सुरु…

⚡वेंगुर्ला ता.२०-: जिल्हा परिषद शिक्षण व आरोग्य सभापती प्रितेश राऊळ व वेंगुर्ला भाजपा शिवसेना पदाधिकारी यांनी सोमवारी घेराव घालीत वीज वितरणला दिलेल्या दणक्यानंतर वेंगुर्ला वीज वितरण विभागामार्फत तालुक्यातील मान्सूनपूर्व कामास त्वरित सुरुवात केली. सोन्सुरे येथे पडलेले 5 पोल व तारा तुटून झालेले नुकसान कव्हर करीत एक दिवसात विजपुरवठा सुरळीत केला. तुळस श्री जैतीर कवळास उत्सवाच्या निमित्ताने ग्रामस्थांच्या मागणीनुसार तेथील विजपुरवठा सुरळीत रहावा, यादृष्टीने सर्व कर्मचारी – स्टाफला सूचना देण्यात आल्या आहेत. सभापती शंकर घारे यांनी केलेल्या सूचनानुसार आडेली खुटवळवाडी येथील स्ट्रीटलाईट कामास सुरुवात करण्यात आली आहे.मठ भागातील तुटलेला कंडक्टर त्वरित जोडण्यात आला असून विजपुरवठा सुरळीत करण्यात आला आहे.वादळानंतर पाल अणसूर भागातील पुरवठा सुरळीत करण्यात आला आहे. मठ भागातील अंडरग्राउंड विजवाहिन्याचे काम बाबत संबंधित एजन्सीला त्वरित सूचना देण्यात येणार आहेत. तसेच वेंगुर्ला शहर एरियातील धोकादायक झाडी कटिंगचे काम बुधवारपासून करण्यात येणार आहे. याबाबत संपूर्ण तालुक्यात मान्सूनच्या अनुषंगाने आवश्यक अपूर्ण कामे त्वरित हाती घेण्यात येणार आहेत.

You cannot copy content of this page