अनिस’च्या सिंधुदुर्गअध्यक्षपदी ॲड. राजीव बिले…

⚡कुडाळ ता.२०-: अखिल भारतीय अंधश्रध्दा निर्मुलन समितीच्या सिंधुदुर्ग अध्यक्षपदी ॲड. राजीव बिले , सचिव पदी अजित कानशिडे व जिल्हा संघटक पदी विजय चौकेकर यांची निवड करण्यात आली आहे. राष्ट्रिय उपाध्यक्ष अंधश्रध्दा निर्मुलन समितीचे रवींद्र खानविलकर व राज्य संघटक हरिभाऊ पाथोडे यांनी ही निवड केली आहे.
दि 1 एप्रिल 2026 ते 31 मार्च 2027 या कालावधीसाठी अखिल भारतीय अंधश्रध्दा निर्मुलन समिती सिंधुदुर्ग प्रमुख पदांची निवड करण्यात आली. जिल्हा कार्यकारिणीची इतर पदाधिकारी निवड या तीन प्रमुख पदाधिकारी यांनी करावी असा आदेश महाराष्ट्र राज्य अखिल भारतीय अंधश्रध्दा निर्मुलन समितीने दिला आहे.
सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्षपदी ॲड.राजीव बिले ,सचिव अजित कानशिडे , जिल्हा संघटक विजय चौकेकर यांची निवड झालेबद्दल सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.

You cannot copy content of this page