दोडामार्ग तालुक्यात बुद्ध जयंती उत्साहात…

दोडामार्ग, : विश्वशांती दूत गौतम बुद्ध यांच्या २५७० व्या जयंतीनिमित्त तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समिती, दोडामार्ग यांच्या वतीने बुद्ध जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. तालुक्यातील बौद्ध बांधव व भीम अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित राहून गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेला अभिवादन केले.
दोडामार्ग येथील स्नेह रेसिडेन्सी हॉटेल येथे आयोजित या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान श्रीधर बाबुराव जाधव यांनी भूषविले. कार्यक्रमाची सुरुवात गौतम बुद्ध, अशोक सम्राट आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण व मेणबत्ती प्रज्वलन करून करण्यात आली.
या वेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष अंकुश विष्णू जाधव, कार्याध्यक्ष विजय लाड जाधव, उपाध्यक्ष भीमा कृष्णा आयनोळकर, सदस्य प्रकाश लक्ष्मण कांबळे, भगवान महादेव जाधव, मधुकर धर्माजी कदम, कृष्णा बाबी कदम, सचिव दीपक बुद्धाजी जाधव, सहसचिव सखाराम गणुजी कदम, खजिनदार संतोष केशव जाधव, सहखजिनदार सीताराम तानु जाधव यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमादरम्यान तालुक्यातील शैक्षणिक परिस्थितीवर चर्चासत्र घेण्यात आले. उपस्थित मान्यवरांनी आपले मत व्यक्त करताना सांगितले की, मागासवर्गीय समाजातील अनेक विद्यार्थी शिक्षण पूर्ण करूनही नोकरीच्या संधींपासून वंचित राहतात. काही विद्यार्थ्यांना आर्थिक अडचणींमुळे शिक्षण अर्धवट सोडावे लागते. शिक्षणाच्या सुविधा उपलब्ध असूनही काही ठिकाणी त्याचा योग्य उपयोग होत नाही, अशी खंतही व्यक्त करण्यात आली.
“शिक्षणाशिवाय समाजाची प्रगती शक्य नाही. संघटित व्हा, शिक्षण घ्या आणि संघर्ष करा,” या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा अंगीकार करून समाज परिवर्तनासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन भीमा आयनोळकर यांनी केले.

You cannot copy content of this page