⚡बांदा ता.०२-: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख वैभव नाईक यांनी बांदा येथे कार्यकर्त्यांची भेट घेत पक्ष संघटना अधिक मजबूत करण्यासाठी महत्वपूर्ण सूचना दिल्या. आगामी स्थानिक राजकारण, गावागावातील संघटनात्मक बांधणी तसेच युवक व महिला पदाधिकाऱ्यांच्या सक्रिय सहभागावर त्यांनी विशेष भर दिला.
यावेळी बोलताना वैभव नाईक यांनी शिवसेनेचे विचार आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे धोरण तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचे आवाहन केले. प्रत्येक शाखेत नियमित बैठका, नागरिकांच्या समस्या जाणून घेणे आणि सामाजिक उपक्रमांद्वारे पक्षाशी जनसंपर्क वाढविणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच आगामी काळात पक्ष संघटना अधिक सक्षम करण्यासाठी सर्व पदाधिकाऱ्यांनी समन्वयाने काम करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. बैठकीत विविध स्थानिक प्रश्न, युवकांच्या समस्या तसेच पक्षवाढीसंदर्भात चर्चा करण्यात आली. कार्यकर्त्यांनीही आपल्या भागातील विविध प्रश्न मांडत पक्ष संघटना बळकट करण्यासाठी सक्रियपणे काम करण्याची ग्वाही दिली.
यावेळी शहर प्रमुख तथा ग्रामपंचायत सदस्य साईप्रसाद काणेकर, पंचायत समिती सदस्य ऋतिका नाईक, सुशांत पांगम, ओंकार नाडकर्णी, सुनील नाटेकर, राजदीप पावसकर, निखिल मयेकर, विठ्ठल वाळके, प्रदीप कळगुंटकर, ज्ञानेश्वर येडवे, बाळा गायतोंडे, विनायक स्वार, विजय बांदेकर, मोहसीन खान, संदेश नाईक, प्रियेश नाटेकर आदी उपस्थित होते.
फोटो:-
बांदा येथे शिवसेना जिल्हाप्रमुख वैभव नाईक यांचे स्वागत करताना शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते.
बांदा येथे शिवसेना ठाकरे गटाची संघटनात्मक बैठक संपन्न …
