⚡मालवण ता.२५-:
मालवण रेवतळे येथील गोडकर्स आर्ट अकॅडमी तर्फे उन्हाळी सुट्टीत चित्रकला मार्गदर्शन शिबीर आयोजित करण्यात आले आहे. दि. ३ मे ते १२ मे आणि १४ मे ते २३ मे या कालावधीत दहा दिवसांची दोन सत्रे सकाळी १० ते दुपारी १२ आणि सायंकाळी ५ ते ७ या वेळेत होणार आहेत.
यामध्ये शिशुवर्ग ते इयत्ता चौथी, इयत्ता पाचवी ते दहावी आणि हौशी कलारसिकांसाठी हॉबी पेंटिंग गट अशी विभागणी करण्यात आली आहे. या शिबिरात ड्रॉईंग पेंटिंग, आर्ट क्राफ्ट, पाम आर्ट, स्टिकर्स मेकिंग, व्हिजिटेबल प्रीटिंग, पेन्सिल सेडींग, चारकोल, वारली पेंटिंग, कॉफी पेंटिंग, इंक ड्रॉईंग, मॅजिक पेंटिंग, स्टोन ग्लास पेंटिंग, कॉफी पेंटिंग, इंडियन स्टाईल पेंटिंग झ टेक्निक वर्क, फॅब्रिक पेंटिंग आदी विविध प्रकारचे कलाप्रकारांचे प्रात्यक्षिक आणि वर्क वयोगटानुसार करून घेतले जाणार आहे. यां शिबिरात सुप्रसिद्ध चित्रकार विनायक गोडकर हे मार्गदर्शन करणार आहेत. इच्छुक विद्यार्थी व कलाप्रेमींनी शिबिरात सहभागी होण्यासाठी ९९८७७५३३७५ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
