⚡कुडाळ ता २५-: आर्ट ऑफ लिव्हिंग परिवारातर्फे
८ ते १८ वयोगटातील मुला-मुलींच्या सर्वांगीण विकासासाठी ‘अंतर ज्ञान प्रक्रिया’ अर्थात प्रज्ञा योग शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. श्री श्री रविशंकर यांच्या संकल्पनेतून साकारलेले हे शिबिर २ ते ५ मे २०२६ या काळात सकाळी ८ ते १ या वेळेत एसटी स्टँडसमोरील उत्कर्षा हॉलमध्ये होणार आहे, तर ६ ते १२ मे दरम्यान ऑनलाईन सराव घेतला जाईल.
या शिबिरामुळे मुलांची एकाग्रता, आत्मविश्वास आणि निर्णयक्षमता वाढण्यास मदत होणार असून स्मरणशक्ती व सर्जनशीलता विकसित करण्याचे तंत्र यात शिकवले जाणार आहे. तसेच मुले प्रतिबंधमुक्त होतात, जन्मजात प्रतिभा शोध, संवाद कौशल्यात सुधार, अधिक सर्जनशीलता, मजबूत स्मरणशक्ती, सहावी संवेदना वाढवते (6th Sense), उत्तम स्मरणशक्ती, एकाग्रतेत सुधार, अभ्यासात आवड निर्माण होते, उत्तम वैचारीक स्पष्टता व निर्णय क्षमता, भीती दूर करते आणि बरेच काहीया कोर्स मध्ये आहे.
5 मे रोजी पालकांसोबत प्रात्यक्षिक घेण्यात येईल. पालकांनी हजर राहणे आवश्यक आहे.
प्रशिक्षक उमेश वायंगणकर यांनी या संधीचा लाभ घेण्याचे आवाहन केले असून, अधिक माहितीसाठी ९६५७४७९८६६ किंवा ८५५०९६६४२९ तसेच 9168340403, 9422393963, 9763100229, 7798100141, 721846620 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.
आर्ट ऑफ लिव्हिंग तर्फे कणकवलीत मुलांसाठी ‘अनर्ज्ञान प्रक्रिया’ शिबिराचे आयोजन…
