⚡सावंतवाडी ता.२४-: शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख चंद्रकांत कासार व माजी जिल्हाप्रमुख रमेश गावकर यांनी आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान संघटनात्मक बांधणी, आगामी राजकीय घडामोडी तसेच स्थानिक पातळीवरील प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
दोन्ही पदाधिकाऱ्यांनी आपल्या कार्यक्षेत्रातील विविध समस्या व पक्षाच्या बळकटीकरणासाठी आवश्यक उपाययोजना याबाबत ठाकरे यांना माहिती दिली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी कार्यकर्त्यांशी सतत संपर्क ठेवून पक्ष अधिक मजबूत करण्याच्या सूचना दिल्याचे समजते.
उपजिल्हाप्रमुख चंद्रकांत कासार व माजी जिल्हाप्रमुख रमेश गावकर यांची उद्धव ठाकरे यांच्याशी भेट..
