⚡दोडामार्ग ता.२१-:
भारतीय जनता पार्टी दोडामार्ग तालुक्याच्या वतीने गणपत डिंगणेकर यांची तालुका उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. भाजपा जिल्हाध्यक्ष Prabhakar Sawant यांच्या सूचनेनुसार दोडामार्ग येथील पक्ष कार्यालयात आयोजित कार्यक्रमात त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले.
डिंगणेकर यांच्या नियुक्तीमुळे साटेली-भेडशी परिसरात पक्ष संघटन बळकट होण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. नवीन जबाबदारी स्वीकारल्यानंतर त्यांनी पक्षविस्तारासाठी सक्रियपणे काम करण्याचा निर्धार व्यक्त केला.
यावेळी दीपक गवस, आनंद तळणकर, सुनील गवस, देवेंद्र शेटकर, सिद्धेश पांगम, समीर रेडकर आदी उपस्थित होते.
गणपत डिंगणेकर यांची भाजपा तालुका उपाध्यक्षपदी नियुक्ती…
