⚡वेंगुर्ला ता.१६-: वेंगुर्ला मठमार्गे सावंतवाडी या मुख्य मार्गांनजिक अंडरग्राउंड विजवाहिन्यांचे काम करण्यात आले आहे. परंतु मठ गावातील मठकरवाडी येथे पुलानजिक भराव खचला असून यामुळे वाहनधारकास धोका पोहचत आहे. साईडपट्टीच अस्तित्वात नसल्याने येथून प्राथमिक शाळेत जाणाऱ्या शालेय विद्यार्थ्यांना धोका उत्पन्न होत आहे. येथील पुलाच्या कठड्याकडे धोकादायक स्थिती निर्माण झाली आहे.
पावसाळी हंगामात स्थिती गंभीर होऊन अपघात होण्याची शक्यता आहे.
याबाबत वेंगुर्ला तसेच कुडाळ सार्वजनिक बांधकाम विभागास या गंभीर बाबीचे कोणतेही गांभीर्य नसल्याचे स्पष्ट होत आहे. याबाबत संबंधित विभागाने येथे तातडीने लक्ष पुरवावे, अशी मागणी मठ ग्रामपंचायत सदस्य शमिका मठकर, स्थानिक ग्रामस्थ संतोष तळवडेकर, अनिल मठकर, सदाशिव मळगावकर, रोहित बोवलेकर, संदीप मठकर, भरत मेस्त्री आदी ग्रामस्थांनी शासनाकडे केली आहे.
मठ मठकरवाडी मुख्य मार्गांवर धोकादायक स्थितीमुळे शालेय विद्यार्थ्यांना धोका ..
