वायंगणी कासव महोत्सवामुळे पर्यटन विकासास चालना…

आ. दिपक केसरकर:कासव महोत्सवाचे उत्साहात उद्घाटन संपन्न..

⚡वेंगुर्ला ता.१०-: मॅनग्रोव्ह फाउंडेशनचे काम व वेंगुर्ला तालुक्यातील वायंगणी येथील कासव संवर्धन ही अतिशय चांगली मोहीम असून पर्यावरणाचे संतुलित संवर्धन होत आहे. पुढील कालावधीत वायंगणी बिचचे चे पर्यटनदृष्ट्या महत्व आणखी वाढणार आहे. महाराष्ट्र शासन कांदळवन विभाग चे काम अधिक चांगले होण्यासाठी व रोजगार वाढण्याच्या दृष्टीने व पर्यटनातुन जनतेचे उत्पन्न वाढण्यासाठी सर्वकष प्रयत्नाची गरज आहे. पालकमंत्री नितेश राणे हे मत्स्य खात्याचे मंत्री असल्याने जिल्ह्याच्या विकासास निश्चितच अधिक चालना मिळेल, असे प्रतिपादन आ. दिपक केसरकर यांनी वायंगणी ( ता. वेंगुर्ले ) येथे बोलताना व्यक्त केले.

महाराष्ट्र शासन कांदळवन विभाग दक्षिण कोकण वनपरीक्षेत्र ( कांदळवन ) मालवण यांच्या विद्यमाने वेंगुर्ला वायंगणी बीच
येथे शुक्रवारी 10 एप्रिल रोजी सकाळी कासव महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मार्गदर्शन करताना आ. दिपक केसरकर बोलत होते. यावेळी व्यासपीठावर सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर, वेंगुर्ला नगराध्यक्ष दिलीप उर्फ राजन गिरप, जिल्हा परिषद शिक्षण व आरोग्य सभापती प्रितेश राऊळ, मच्छीमार नेते वसंत तांडेल, वायंगणी ग्रामपंचायत सरपंच अवि दुतोंडकर,उपसरपंच अनंत केळजी, वायंगणी पंचायत समिती सदस्य शितल राऊत, माजी जि.प.अध्यक्ष समिधा नाईक, जिल्हा माहिती अधिकारी मुकुंद चिलवत, वेंगुर्ला तहसीलदार ओंकार ओतारी, अतिरिक्त जिल्हाधिकारी प्रतिभा वराळे, मुंबईचे अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक डॉ. रविकिरण गोवेकर, कांदळवन कक्ष, मुंबईच्या उपवनसंरक्षक मधुमिता एस., कोल्हापुरच्या मुख्य वनसंरक्षक श्रीलक्ष्मी ए.,सावंतवाडी वनविभाग उपवनसंरक्षक मिलीश शर्मा, कांदळवन विभाग दक्षिण कोकण, अलिबागच्या विभागीय वन अधिकारी कांचन पवार, कांदळवन विभाग दक्षिण कोकण, अलिबागचे सहाय्यक वनसंरक्षक प्रियांका पाटील, समीक्षा चंद्रहास,
मालवण (कांदळवन) वनपरिक्षेत्र अधिकारी महादेव शिंगाडे, वेंगुर्ला (कांदळवन) वनपरिमंडळ अधिकारी सुनिल सावंत, कांदळवन देवगड वनपाल श्रीकृष्ण परीट, मठ वनपाल सावळा कांबळे, नेरुर वनपाल सु.म.सावंत,कुडाळ वनपरिक्षेत्र अधिकारी संदीप कुंभार, सामाजिक वनीकरण अधिकारी दत्तगुरु पिळणकर, कासवमित्र सुहास तोरसकर , वेंगुर्ला भाजपा तालुकाध्यक्ष विष्णू उर्फ पप्पू परब, मच्छीमार नेते दादा केळुसकर, नगरसेवक संदेश निकम, खानोली सरपंच सुभाष खानोलकर, वायंगणी माजी उपसरपंच हर्षद साळगावकर , दाभोली उपसरपंच श्रीकृष्ण बांदवलकर, सौरभ नाईक, सायमन आलमेडा, सर्व ग्रा. पं. सदस्य आदी उपस्थित होते. सकाळी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या हस्ते महोत्सव शुभारंभ करण्यात आला. त्यानंतर आ. दिपक केसरकर व अन्य मान्यवरांच्या हस्ते
सकाळी ८ वा. नवजात समुद्री कासव पिल्लांना समुद्रात सोडण्यात आले. आ. दिपक केसरकर यांच्या हस्ते आरवली येथील वाळूशील्पकार रविराज चिपकर यांनी साकारलेल्या आकर्षक कासव वाळुशिल्पाचे फित कापुन अनावरण करण्यात आले. यानंतर प्रमुख कार्यक्रमाचे आ. दिपक केसरकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून उदघाट्न करण्यात आले.यावेळी आ. दिपक केसरकर व अन्य प्रमुख मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.तसेच कासव संवर्धनामध्ये उत्कृष्ट काम करणाऱ्या कासव मित्रांचा
सन्मान करण्यात आला.
भालचंद्र तोरसकर, चंद्रशेखर तोरसकर, सूरज तोरसकर, प्रकाश साळगावकर, प्रकाश सागवेकर, संतोष साळगावकर, गौरेश खडपकर आदींचा सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच कासव महोत्सव ठिकाणी आरवली सोनसुरे येथील वाळूशिल्पकार रविराज चिपकर यांनी साकारलेल्या आकर्षक कासव वाळू शिल्पाबद्दल आमदार दीपक केसरकर यांच्या हस्ते त्यांचाही सत्कार करण्यात आला. यावेळी गेल्या अनेक वर्षापासून कासव संवर्धन जतन यासाठी प्रामाणिक प्रयत्न करणारे कासवमित्र सुहास तोरसकर यांचा खास वन विभाग व कांदळवन विभाग यांच्या वतीने गौरवोदगार काढण्यात आले. यावेळी कासव संवर्धन बाबत विभागीय वन अधिकारी कांचन पवार यांनी
मार्गदर्शन केले. तृप्ती धोडमिसे यांनीही कासव संवर्धन बाबत मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अक्षय पावसकर व प्रियांका पाटील यांनी आभार मानले.

You cannot copy content of this page