⚡सावंतवाडी ता.०४-: किनळे येथील माऊली सातेरी रंगमंचावर शनिवार दिनांक ११ एप्रिल रोजी रात्रौ १० वाजता माऊली कृपा नाट्य वृंद , किनळे प्रस्तुत सामाजिक हृदयस्पर्शी दोन अंकी “चौथरा” या नाटकाचे आयोजन करण्यात आले आहे.
या नाटकाचे लेखक यशवंत माणके असून, दिग्दर्शक दशरथ नाईक, निर्माता राजाराम नाईक, नेपथ्य यश रंगमंच आरोंदा, रंगभूषा उमेश कोंडये, पार्श्वसंगीत सत्यवान नाईक यांचे असून किनळे येथील कलाकार यातील भूमिका साकारणार आहेत.
या नाट्यप्रयोगाला नाट्यरसिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन किनळे ग्रामस्थांनी केले आहे.
किनळे येथे ११ एप्रिल ला “चौथरा” नाटक…
