मालवणात १४ रोजी जिल्हास्तरीय ग्रुप डान्स स्पर्धा…

⚡मालवण ता.०३-:
विश्वरत्न, महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंती महोत्सवानिमित्त समाज मंदिर, बांगीवाडा मालवण येथे ‘बुद्ध भीमगीते’ जिल्हास्तरीय ग्रुप डान्स स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

ही स्पर्धा दि. १४ एप्रिल रोजी रात्री ९.३० वा. होणार असून, जिल्ह्यातील नृत्यगटांचा सहभाग अपेक्षित आहे. स्पर्धेत प्रथम पारितोषिक ९,९९९ रुपये, द्वितीय पारितोषिक ७,९९९ रुपये, तृतीय पारितोषिक ५,९९९ रुपये असे ठेवण्यात आले आहे. तसेच उत्तेजनार्थ पारितोषिके व प्रेक्षक पसंती पारितोषिकही देण्यात येणार आहे. प्रत्येक सहभागी गटाला सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देण्यात येईल. अधिक माहितीसाठी व नोंदणीसाठी विरेश वळंजू ८२७५६४९३९९ यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

You cannot copy content of this page