झाराप ग्रा.पं.चा दिव्यांगांना आधार ; व्हीलचेअर वाटप…

⚡कुडाळ ता.०३-: तालुक्यातील झाराप ग्रामपंचायतीने सामाजिक बांधिलकी जपत दिव्यांग निधीतून गरजू लाभार्थ्यांना मदतीचा हात पुढे केला आहे. दिव्यांग बांधव सहदेव गोविंद बिडये यांना नुकतेच व्हीलचेअरचे वाटप करण्यात आले. या उपक्रमामुळे ग्रामपंचायतीच्या कार्याची सर्वत्र प्रशंसा होत आहे.
सरपंच दक्षता मेस्त्री यांच्या हस्ते सहदेव बिडये यांना व्हीलचेअर प्रदान करण्यात आली. यावेळी उपसरपंच मंगेश गावकर, ग्रामपंचायत सदस्य तनया मांजरेकर, संजीवनी पेंडूरकर, अमृता हरमलकर, विशाखा गोडे, ग्रामसेवक गंगाराम वेंगुर्लेकर, तलाठी सुषमा गायकवाड, आरोग्य सेवक आकाश तायंडे, आरोग्य सेविका सुमन पालव, CHO अंकिता गावकर, आशा कार्यकर्ती सारिका वारंग यांच्यासह सदाशिव आळवे, प्रकाश सावंत, गोविंद बिडये व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या वेळी बोलताना मान्यवरांनी सांगितले की, “दिव्यांग बांधवांना स्वावलंबी बनविण्यासाठी ग्रामपंचायतीने अशा योजनांचा अधिकाधिक लाभ मिळवून देण्याचा प्रयत्न सुरू ठेवला आहे.”
गावात या उपक्रमामुळे समाधानाचे वातावरण असून “गरजूंना वेळेवर मदत” हा संदेश झाराप ग्रामपंचायतीने पुन्हा एकदा कृतीतून दाखवून दिला आहे.

You cannot copy content of this page