⚡मालवण ता.०२-:
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची सागरी राजधानी असणाऱ्या किल्ले सिंधुदुर्गचा ३५९ वा वर्धापन दिन वायरी येथील मोरयाचा धोंडा आणि किल्ले सिंधुदुर्ग येथे जय भवानी, जय शिवाजी, छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा घोषणाच्या निनादात मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.
किल्ले सिंधुदुर्ग प्रेरणोत्सव समिती व शिवप्रेमी यांच्या वतीने किल्ले सिंधुदुर्गचा ३५९ वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला.
सकाळी मोरयाचा धोंडा येथे माजी नगरसेवक रविकिरण आपटे यांच्या पौरोहित्याखाली मालवणच्या नगराध्यक्षा ममता वराडकर यांच्या हस्ते विधिवत गणेश पूजन करण्यात आले. तसेच मोरेश्वर चरणी गाऱ्हाणे घालण्यात आले. यावेळी यावेळी किल्ले सिंधुदुर्ग प्रेरणोत्सव समितीचे अध्यक्ष गुरुनाथ राणे, उपाध्यक्ष डॉ. ज्योती तोरसकर, उपनगराध्यक्ष दीपक पाटकर, नगरसेवक ललित चव्हाण, रविकिरण तोरस्कर नगरसेवक तपस्वी मयेकर, वायरी भूतनाथ सरपंच भगवान लुडबे, पंचायत समिती उपसभापती श्याम झाड, विजय केनवडेकर, दत्तात्रय नेरकर, मोहन वराडकर, प्रदीप वेंगुर्लेकर, भाऊ सामंत, प्रा. सुमेधा नाईक, विनोद शंकरदास, वैशाली शंकरदास, दादा वेंगुर्लेकर, सुर्यकांत फणसेकर, रत्नाकर कोळंबकर, सचिन गोवेकर, पराग परब, हनु हडकर, शुभम लुडबे, कामत, स्वामी गोवेकर, नारायण धुरी व इतर उपस्थित होते.
किल्ले सिंधुदुर्ग येथील हनुमान मंदिरात हनुमान स्तोत्र पठण केल्यानंतर श्री शिवराजेश्वर मंदिर येथे जात छत्रपतींना अभिवादन करण्यात आले. यावेळी अनिकेत फाटक यांनी दिलेली हापुसचे आंबे महाराजांच्या चरणी अर्पण करण्यात आले. तसेच अध्यक्ष गुरुनाथ राणे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी मोरयाचा धोंडा लवकरात लवकर संरक्षित व्हावा असे साकडे घालण्यात आले. यावेळी शिवप्रतिज्ञा करण्यात आली. यानंतर सांस्कृतिक लोककला क्रीडा मंडळ मर्दानी खेळ वायरी यांनी मर्दानी खेळांचे प्रात्यक्षिक दाखविले. अजित आंबेरकर, सचिन आंबेरकर, केतन आजगावकर, आकाश आंबेरकर, पुष्कर आंबेरकर, ऋषिकेश पाटील, नितेश पाटील, अरुण भगत यांनी मर्दानी खेळाची प्रात्यक्षिके सादर केली. यावेळी सिंधुदुर्ग किल्ला प्रेरणोत्सव समितीचे अध्यक्ष गुरुनाथ राणे, उपाध्यक्ष सौ. ज्योती तोरसकर यांनी दरवर्षी अशाचप्रकारे एकत्र येऊन सिंधुदुर्ग किल्ल्याचा वर्धापन दिन साजरा करण्यासाठी योगदान द्यावे, असे आवाहन केले.
