राज्य समन्वयक यांच्या उपस्थितीत कुडाळमध्ये बैठक..
⚡कुडाळ ता.०२-: शिवसेनेच्या आज कुडाळ येथे झालेल्या बैठकीत संघटनात्मक बळकटी, आगामी नियोजन व जनतेशी संपर्क वाढवण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
आज कुडाळ येथील महालक्ष्मी हॉलमध्ये कुडाळ–मालवण विधानसभा मतदारसंघातील शिवसेना पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक पार पडली. या बैठकीला उपस्थित राहून आमदार निलेश राणे यांनी शिवसैनिकांशी संवाद साधला.
या बैठकीस शिवसेना महाराष्ट्र राज्य समन्वयक सचिन जोशी, राजेश मोरे, माजी आमदार राजन तेली, उपनेते संजय आंग्रे, जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, संजू परब, संपर्कप्रमुख बाळा चिंदरकर, जिल्हा परिषद उपाध्यक्ष दादा साईल, महिला जिल्हाध्यक्षा सौ. दीपलक्ष्मी पडते, सौ. नीता कविटकर, संतोष साटविलकर, सचिन वालावलकर, संजय पडते, काका कुडाळकर, कुडाळ नगराध्यक्षा सौ. प्राजक्ता शिरवलकर, उपजिल्हाप्रमुख, विधानसभा प्रमुख तसेच पुरुष, महिला व युवा पदाधिकारी, नगरसेवक, लोकप्रतिनिधी, आजी-माजी सदस्य, जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य, शाखाप्रमुख आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
