केवळ दैव बलवत्तर…

भाजपा पदाधिकारी अजित नाईक यांची कार्यतत्परता..

⚡वेंगुर्ला ता.०२-: वेंगुर्ला तालुक्यातील वेंगुर्ला सावंतवाडी मुख्य मार्गांवर बुधवारी सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास मठ ठाकुरवाडी येथील वळणावर एका मालवाहतूक ट्रकला अडकून झाडाच्या फ़ांद्या तुटून मुख्य रस्त्यावर पडल्या. सुदैवाने यावेळी मागाहून प्रवास करणारे दोन दुचाकीस्वार यातून थोडक्यात बचावले होते.याबाबत माहिती मिळताच मठ येथील भाजपचे पदाधिकारी अजित नाईक, मंगेश ठाकूर, सिद्धेश ठाकूर यांनी रात्री सदर फ़ांद्या कटिंग करून वाहतूक सुरळीत केली.अजित नाईक हे गेली कित्येक वर्षे अशाच प्रकारे सामाजिक कार्य जोपासत आहेत. यावेळी वाहनधारकांनी समाधान व्यक्त केले. सदर मार्गांवरील झाडी धोकादायक ठरत असून झाडी कटिंग करण्याची मागणी वाहनधारकांतून करण्यात आली आहे.

You cannot copy content of this page