जखमी घार पिल्लाचे वनविभागाकडून तत्काळ रेस्क्यू.

⚡बांदा ता.०२-: बांदा येथील देऊळवाडी परिसरात जखमी अवस्थेत आढळलेल्या घार पक्ष्याच्या पिल्लाला वनविभागाच्या आरआरटी (रॅपिड रेस्क्यू टीम) पथकाने तातडीने रेस्क्यू करून जीवदान दिले.
देऊळवाडी येथे घार पक्ष्याचे पिल्लू जखमी अवस्थेत पडल्याची माहिती स्थानिकांना मिळाली. ही बाब माजी सरपंच आबा धारगळकर यांच्या निदर्शनास येताच त्यांनी तात्काळ वनविभागाशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच वनविभागाच्या आरआरटी पथकाने घटनास्थळी धाव घेत जखमी पिल्लाला सुरक्षित ताब्यात घेतले.
यानंतर या पिल्लाला पुढील उपचार व काळजी मिळावी यासाठी सावंतवाडी येथे वनविभागाच्या ताब्यात वैद्यकीय सेवेसाठी हलविण्यात आले. माजी सरपंच आबा धारगळकर यांच्या तत्परतेमुळे घार पक्ष्याच्या पिल्लाला वेळेत मदत मिळून जीवदान मिळाले.
या रेस्क्यू मोहिमेत आरआरटी प्रमुख रामचंद्र रेडकर यांच्यासह पथकातील सदस्य शुभम फाटक व देवेंद्र परब यांनी सहभाग घेतला. वनविभागाच्या या तातडीच्या कारवाईचे परिसरातील नागरिकांकडून कौतुक करण्यात येत आहे.

You cannot copy content of this page