⚡ओरोस ता २-: महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० मधील कलम ८१ (१) (ब) तसेच महाराष्ट्र सहकारी संस्था नियम १९६१ मधील नियम ६९ (१) (फ) नुसार सहकारी संस्थांच्या लेखापरीक्षणासाठी सन २०२६ ते २०२८ या कालावधीसाठी राज्यस्तरीय लेखापरीक्षकांची नामतालिका तयार करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
यासाठी इच्छुक पात्र उमेदवारांकडून https//mahasahakar.maharashtra.gov.in/en/ या पोर्टलवर ६ एप्रिल २०२६ ते २० एप्रिल २०२६ या कालावधीत ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्यासाठी सहकार विभागाच्या अधिकृत संकेतस्थळाचा वापर करावा लागणार आहे. ऑनलाईन अर्ज प्रक्रियेबाबत सविस्तर परिपत्रक सहकार विभाग, सहकार आयुक्त व निबंधक यांच्या संकेतस्थळावर उपलब्ध असून, जिल्हा उपनिबंधक, जिल्हा विशेष लेखापरीक्षक तसेच विभागीय सहनिबंधक कार्यालयांमध्येही माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे.
याबाबत अधिक माहितीकरिता सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी आवाहन केले आहे.
लेखापरीक्षक नामतालिकेसाठी ऑनलाईन अर्जांची प्रक्रिया सुरू..
