कलमठ ग्रामपंचायतीत शीत शवपेटीचे लोकार्पण…!

⚡सावंतवाडी ता.३१-: ग्रामपंचायतीच्या पंधराव्या वित्त आयोगाच्या निधीतून कलमठ गावासाठी नवीन शीत शवपेटी उपलब्ध करून देण्यात आली आहे. अनेक दिवसांपासून ग्रामस्थांकडून होत असलेली मागणी यामुळे पूर्ण झाली आहे.

ग्रामपंचायत माध्यमातून विविध सुविधा उपलब्ध करून देण्याचा सातत्याने प्रयत्न सुरू असून, त्यात आज आणखी एका महत्त्वाच्या सेवेची भर पडल्याचे सरपंच संदीप मेस्त्री यांनी सांगितले. ग्रामस्थांच्या उपस्थितीत शीत शवपेटीचे लोकार्पण करण्यात आले.

या कार्यक्रमाला जिल्हा परिषद सदस्य सुप्रिया मेस्त्री, पंचायत समिती सदस्य गुरुनाथ वर्देकर, उपसरपंच दिनेश गोठणकर, महेश लाड, स्वप्निल चिंदरकर, अनुप वारंग, नितीन पवार, प्रीती मेस्त्री, नजराना शेख, श्रेयस चिंदरकर, नाना कांबळी, आबा ढवण, सुरेश कोरगावकर, तनोज कळसुलकर, सुरेश ढवण, राजू कोरगावकर, शरद कुडतरकर, बाळा आचरेकर, हेलन कांबळे, बाबू नारकर, दिगंबर मर्तल, सुनील रेपाळ, स्वरूप कोरगावकर, जयराम चिंदरकर, आबा कोरगावकर, बाबू पाष्टे, पपू कोरगावकर, नंदू कोरगावकर, परेश कांबळी, नाना गोठणकर, अशोक कदम, संजय बेलवलकर यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

You cannot copy content of this page