रत्नागिरी-सिंधुदुर्ग शिवसेना विभागीय संपर्कप्रमुखपदी किरण सामंत यांची निवड…

⚡सिंधुदुर्ग ता.३१ प्रसन्न गोंदावळे-: रत्नागिरी-सिंधुदुर्ग शिंदे शिवसेना विभागीय संपर्कप्रमुखपदी राजापूर मतदार संघाचे आमदार किरण सामंत यांची निवड करण्यात आली आहे. याबाबतची निवड उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून करण्यात आली आहे.

दरम्यान किरण सामंत यांची निवड झाल्याबद्दल राजापूर-लांजा विधानसभा मतदारसंघात त्यांच्या कार्यक्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.शिवसेनेच्या संघटनात्मक बळकटीसाठी आणि पक्षविस्तारासाठी करण्यात आलेल्या या निवडीबद्दल विविध स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. कार्यकर्त्यांनी त्यांना शुभेच्छा देत पुढील कार्यकाळासाठी विश्वास व्यक्त केला आहे.किरण (भैय्या) सामंत यांच्या निवडीमुळे रत्नागिरी-सिंधुदुर्ग विभागात पक्ष संघटन अधिक मजबूत होण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. तसेच स्थानिक पातळीवरील प्रश्न सोडविण्यास आणि कार्यकर्त्यांना दिशा देण्यास त्यांच्या अनुभवाचा लाभ होणार असल्याचे मत व्यक्त करण्यात येत आहे.या निवडीबद्दल विविध पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकांनी त्यांचे हार्दिक अभिनंदन केले आहे.

You cannot copy content of this page