⚡मालवण ता.२६-:
लायन्स क्लब मालवणच्या अध्यक्षा सौ. अनुष्का अवधूत चव्हाण यांची लायन्स क्लबच्या एम.जे.एफ. म्हणून निवड करण्यात आली असून सौ. चव्हाण या लायन्स क्लबच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिल्या महिला एम.जे.एफ. ठरल्या आहेत.
चिपळूण येथे पार पडलेल्या लायन्स क्लबच्या श्री संध्या या रिजन कॉन्फरन्समध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिली महिला MJF म्हणुन लायन्स क्लब ऑफ मालवणच्या अध्यक्षा अनुष्का अवधुत चव्हाण यांना सन्मानचिन्ह तसेच पिन देऊन लायन्स क्लबच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांकडून सन्मानित करण्यात आले. त्यांच्या या निवडीबद्दल त्यांचे सर्वांकडून अभिनंदन होत आहे.
