मठ पेट्रोलपम्प येथे पेट्रोल पुरवठा सुरु असल्याने समाधान..
⚡वेंगुर्ला ता.२६-: तालुक्यातील एकूण पाच पेट्रोलपंप वरील पेट्रोल – डिझेल साठा आज गुरुवारी 26 मार्च रोजी दुपारपर्यंत उपलब्ध होता. दरम्यान त्यानंतर रिझर्व्ह साठा वगळता पेट्रोल डिझेल साठा पुरवठा न झाल्याने वाहनधारकांना वेटिंगवरच रहावे लागले. दरम्यान दोन ठिकाणी रात्री 10-11 वाजेपर्यंत पूर्ववत साठा उपलब्ध होईल, अशी माहिती वेंगुर्ला तहसीलदार ओंकार ओतारी यांनी दिली. वेंगुर्ला शहरातील भटवाडी येथील पेट्रोलपम्प वर दुपारी 2 वाजेपर्यंत पुरवठा सुरु होता.तर सिएनजी पुरवठा सुरु होता. उभादांडा मानसीश्वर पेट्रोलपम्प येथे सायंकाळी 4 वाजेपर्यंत पुरवठा सुरु होता. राऊळवाडा येथील पेट्रोलपंप वर बुधवारी रात्रीपासून पुरवठा बंद आहे. परुळे येथील पेट्रोलपम्प वर सकाळी 10 वाजेपर्यंत पुरवठा सुरु होता. तर मठ येथील पेट्रोलपंप वर गुरुवारी रात्री उशिरापर्यंत पेट्रोल पुरवठा सुरु होता. यामुळे समाधान व्यक्त करण्यात आले. तर येथील डिझेल पुरवठा बंद होता. दरम्यान शुक्रवारी सकाळी पुरवठा पूर्ववत सुरु राहणार असल्याचे व्यवस्थापकामार्फत सांगण्यात आले.
