देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री बनविण्याची दिवास्वप्ने आमदार नितेश राणेंनी पाहू नयेत…

सुशांत नाईक यांचा प्रसिद्धी पत्रकातून नितेश राणेंना टोला_

*💫कणकवली दि.२४-:* फसवेगिरी करणे ठाकरेंच्या रक्तात नाही. त्यामुळे उद्धव ठाकरेंनी राजीनामा देऊन त्यामुळे ११७ आमदारांचा पाठिंबा असणाऱ्या देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री बनविण्याची दिवास्वप्ने आमदार नितेश राणेंनी पाहू नयेत, असा टोला नगरसेवक सुशांत नाईक यांनी प्रसिद्धी पत्रकातून नितेश राणेंना लगावला आहे. उद्धव ठाकरेंनी राजीनामा देऊन देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री करावे, मग महाराष्ट्रासाठी केंद्रातून मदत आणतो, असे बालिश वक्तव्य करणाऱ्या आमदार नितेश राणेंना नाईक नाईक यांनी प्रसिद्धी पत्रकातून उत्तर दिले आहे. नाईक म्हणाले, विधानसभेत १७० आमदारांचा पाठिंबा असल्यामुळे उद्धव ठाकरे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान आहेत. महाराष्ट्राला मदत आणण्यासाठी मुळात या भुमीविषयी मनात नितांत आदर व प्रेम असावे लागते. महाराष्ट्रात सत्ता असेल तरच केंद्राकडून मदत मिळेल हे भाजपचे आमदार नितेश राणेंनी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरीत्या स्पष्ट केल्यामुळे ‘नेशन फर्स्ट’चा मुखवटा घालुन फिरणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींचा खरा चेहरा देशातील जनतेसमोर आला आहे. पंतप्रधान मोदींसाठी देश प्रथम नसुन ज्याठिकाणी भाजपची सत्ता आहे त्याच राज्यांवर त्यांचे जास्त प्रेम आहे, हे नितेश राणेंच्या वक्तव्यामुळे सिद्ध झाले आहे. महाराष्ट्र आणि केरळ मध्ये तौक्ते चक्रीवादळाने थैमान घातलेले असताना फक्त भाजपशासित गुजरात राज्याला एक हजार कोटी रुपये मदतीचे आर्थिक पँकेज जाहीर करून पंतप्रधान मोदींनी आपण जाहीरपणे राज्याराज्यात भेदभाव करतो याची पुष्टी दिली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आपल्या शब्दाचे पक्के आहेत. त्यामुळे भाजपच्या नेत्यांप्रमाणे फसव्या पँकेजची घोषणा करणे त्यांच्या स्वभावात नाही. त्यासाठीच चक्रीवादळामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात झालेल्या नुकसानीचा पुर्ण आढावा घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जिल्ह्यासाठी भरीव आर्थिक मदत जाहीर करणार आहेत. एवढ्यावरच न थांबता वादळांपासून जिल्ह्यातील किनारपट्टीवर सुरक्षिततेच्या द्रुष्टीने कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कटीबद्ध आहेत. या उलट देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्री असताना कल्याण डोंबिवली महानगरपालिकेला निवडणुकीदरम्यान साडे सहा हजार कोटींच्या पँकेजचे गाजर दाखवले होते. निवडणुका संपल्यानंतर त्यातला एक रुपया सुद्धा दिला नाही. नारायण राणेंनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात कँबिनेटची बैठक आयोजित करून कोकणसाठी पाच हजार कोटी रुपयांच्या पँकेजची घोषणा केली होती. त्यातील पाचशे कोटी तरी मिळाले आहेत का, असा सवालही नाईक यांनी केला आहे.

You cannot copy content of this page