वेंगुर्ला तालुक्यात पुरेसा पेट्रोल साठा उपलब्ध : तहसीलदार ओंकार ओतारी…

⚡वेंगुर्ला ता.२५-: वेंगुर्ला तालुक्यात पेट्रोल – डिझेल चा पुरेसा साठा उपलब्ध आहे, अशी माहिती वेंगुर्ला तहसीलदार ओंकार ओतारी यांनी दिली आहे . तालुक्यातील चारही पेट्रोलपम्प वर पुरेसा पेट्रोल – डिझेल साठा उपलब्ध असून नागरिकांनी अफ़वावर विश्वास ठेऊ नये. चुकीचे फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करू नयेत.
असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. दरम्यान वेंगुर्ला शहरातील भटवाडी येथील पेट्रोलपम्प वर पुरेसा साठा उपलब्ध असल्याची माहिती व्यवस्थापनाने दिली. तसेच उभादांडा मानसीश्वर पेट्रोलपम्प येथेही पुरेसा पेट्रोल डिझेल साठा उपलब्ध असल्याची माहिती व्यवस्थापनाने दिली.

You cannot copy content of this page