सावंतवाडी तालुका राष्ट्रवादीतर्फे सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्याकडे मागणी
*💫सावंतवाडी दि.२४-:* तळवडे व खेरवाडी गावातील लोकांची गैरसोय टाळण्यासाठी तळवडे-खेरवाडी येथील बंधाऱ्याचे काम लवकरात लवकर पूर्ण करून शेतकऱ्यांचे नुकसान टाळावे, अशी मागनी सावंतवाडी तालुका राष्ट्रवादीतर्फेयेथील बंधारा फुटून शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने तळवडे गावातील लोकांची गैरसोय टाळण्यासाठी या बंधाऱ्याचे काम लवकरात लवकर पूर्ण करून शेतकऱ्यांचे नुकसान टाळावे, अशी मागनी सावंतवाडी तालुका राष्ट्रवादीतर्फे महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे संपर्क मंत्री बाळासाहेब पाटील यांच्याकडे करण्यात आली. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या नुकसानग्रस्त भागाची बाळासाहेब पाटील यांनी प्रत्यक्ष पहाणी केली. यावेळी आमदार दीपक केसरकर, माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले , जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत, प्रदेश संघटक सचिव काका कुडाळकर, माजी जिल्हाध्यक्ष व्हीक्टर डान्टस, सुनील भोगटे, बाळ कन्याळकर, भास्कर परब, सावंतवाडी तालुका अध्यक्ष पुंडलिक दळवी, देवा टेमकर, इफ्तिकार राजगुरू, शफिक खान, राजू धारपवार आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. सावंतवाडी तालुक्यातील तळवडे गावातील खेरवाडी येथील बंधारा फुटून शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तसेच अलीकडे वस्ती व बंधाराच्या पलीकडे शेती अशा परिस्थितीमुळे बंधारा वाहून गेल्याने या बंधार्यावरून ये-जा करणाऱ्या लोकांचे व शाळकरी मुलांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या बंधारा शेजारील विहिरीतून तळवडे गावाला पाणीपुरवठा केला जातो. त्यामुळे तळवडे गावातील लोकांची गैरसोय टाळण्यासाठी या बंधाऱ्याचे काम लवकरात लवकर पूर्ण करून शेतकऱ्यांचे नुकसान टाळावे अशी मागणी करण्यात आली आहे.
