स्पर्धेच्या युगात आव्हानांना सामोरे जाऊन स्वतःची ओळख निर्माण करणे गरजेचे…

संदेश पारकर:सामाजिक, संस्कृतीक कार्यक्रमांमुळे नवोदित कलाकारांना प्रोत्साहन मिळते..

वेंगुर्ला : स्पर्धेच्या युगात प्रत्येकाने आव्हानांना सामोरे जात स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणे आवश्यक असल्याचे आहे. अशा उपक्रमांमुळे सांस्कृतिक चळवळीला बळ मिळत असून नवोदित कलाकारांना प्रोत्साहन मिळत आहे, असे प्रतिपादन कणकवली नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी केले. वेंगुर्ले राउळवाडा येथे जबरदस्त सांस्कृतिक कला क्रीडा मंडळाच्यावतीने आयोजित करण्यात आलेला सांस्कृतिक महोत्सवात ते बोलत होते.

यावेळी वेंगुर्ला चे माजी सभापती यशवंत उर्फ बाळू, नगरसेविका गौरी मराठे, समिधा रेडकर, लीना म्हापणकर, गौरी माईनकर, ऍड. मनीष सातार्डेकर, पंकज शिरसाट, साबाजी राऊळ, मंजुषा आरोलकर, रुंदा गवंडळकर, मनाली परब, नीलम बोवलेकर, अजित राऊळ आदी उपस्थित होते.

यावेळी श्री. पारकर म्हणाले, महोत्सवाच्या माध्यमातून स्थानिक कलाकारांना आपली कला सादर करण्यासाठी या महोत्सवाच्या माध्यमातून व्यासपीठ उपलब्ध झाले आहे. विविध सांस्कृतिक कार्यक्रमांमुळे प्रेक्षकांना दर्जेदार मनोरंजनाची मेजवानी मिळाली. सिंधुदुर्ग जिल्हा हा पर्यटन, अध्यात्मिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात आघाडीवर असून येथे अनेक कर्तृत्ववान व्यक्तिमत्त्वे घडली आहेत. वेंगुर्ला तालुकाही सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमांमध्ये सातत्याने अग्रेसर असल्याचे श्री. पारकर म्हणाले.

पुढे ते म्हणाले की, सिंधुदुर्ग जिल्ह्यात अनेक कलाकार घडले. दशावतार प्रामुख्याने या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात चालते. अनेक कंपनी या जिल्ह्यात कार्यरत आहेत. वेंगुर्लेवासियांचे प्रेम, विश्वास आणि आशीर्वाद सतत माझ्यावर राहिल्यामुळेच मी या पदापर्यंत पोहोचू शकलो आहे. त्यामुळे माझ्यावर जि काही जबाबदारी येईल त्या माध्यमातून काम करून न्याय देण्याचा प्रयत्न मी नक्कीच करणार आहे.

वेंगुर्ला राउळवाडा येथे जबरदस्त सांस्कृतिक कला क्रीडा मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेला सांस्कृतिक महोत्सव उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. गेली चार वर्षे सातत्याने आयोजित केला जाणारा हा महोत्सव स्थानिक कला व संस्कृतीचा वारसा जपणारा ठरत असून यंदाही मोठ्या प्रतिसादात पार पडला.

अवनिशने सांगितला संदेश पारकर यांचा जन्म वार

सिंधुदुर्ग जिल्हा हा नररत्नांची खाण म्हटला जातो. या जिल्ह्यात लहान थोर अशी रत्न आहेत. ज्यांचा कला खरोखरच कल्पनेच्या बाहेर आहेत. तब्बल पन्नास वर्षा आधीपासून चे कॅलेंडर, वार, दिनांक, सण अचूक सांगणारा कळणे शाळेत शिकत असलेला ८ वर्षीय विद्यार्थी अवनिष असे त्याचे नाव. याचा सत्कार या महोत्सवात करण्यात आला. याला नगराध्यक्ष संदेश पारकर यांची जन्म तारीख सांगून वार विचारण्यात आला त्याने तो वार अचूक सांगितला. दरम्यान त्याने उपस्थितांची मने जिंकली होती. नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी त्याचे कौतुक केले.

You cannot copy content of this page