केसरकरांच्या राजीनाम्यासाठी ठाकरे शिवसेनेचा सावंतवाडीत भव्य मोर्चा..

भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणात केसरकर हे खरे सूत्रधार: त्यांची एसआयटी मार्फत चौकशी करा ;रुपेश राऊळ यांची मागणी ..

⚡सावंतवाडी, ता. २४ -: आमदार दीपक केसरकर यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी सावंतवाडीतील ठाकरे शिवसेनेने भव्य मोर्चा काढत त्यांच्या विरोधात जोरदार निषेध व्यक्त केला. भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणात केसरकर यांचे नाव समोर आल्यामुळे सावंतवाडीची बदनामी झाल्याचा आरोप करत त्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणी करण्यात आली.
या संदर्भात प्रांत अधिकारी कार्यालयाला निवेदन देऊन केसरकर यांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

यावेळी रुपेश राऊळ बोलताना म्हणाले की, भोंदू बाबा अशोक खरात यांना राजकीय पाठबळ केसरकर यांच्या माध्यमातून मिळाले. त्यामुळे या प्रकरणाचे खरे सूत्रधार केसरकरच असून त्यांचा तात्काळ राजीनामा घ्यावा, अशी मागणी त्यांनी केली. तसेच या प्रकरणाची एसआयटीमार्फत सखोल चौकशी करण्यात यावी, असेही त्यांनी नमूद केले.
“केसरकर यांना जर लाज-शरम असेल, तर त्यांनी तत्काळ राजीनामा द्यावा,” असेही राऊळ यांनी ठणकावून सांगितले. यावेळी कार्यकर्त्यांनी केसरकर यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत संपूर्ण प्रकरणाचा निषेध व्यक्त केला.
या मोर्चात ठाकरे शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

You cannot copy content of this page