कै. प्रशांत अळवणी व कै. बाळकृष्ण नाईक यांच्या स्मरणार्थ दात्यांकडून मदतीचा हात..
⚡सावंतवाडी ता.२४-: सामाजिक बांधिलकी जपत रुग्णसेवेसाठी उभारण्यात येणाऱ्या रुग्णवाहिकेसाठी विविध दात्यांकडून मदतीचा ओघ सुरू असून अलीकडेच एकूण ४५ हजार रुपयांची देणगी संस्थेकडे सुपूर्त करण्यात आली.
शशिकला अळवणी परिवार, सावंतवाडी यांच्या वतीने कै. प्रशांत आत्माराम अळवणी यांच्या स्मरणार्थ २५ हजार रुपयांची देणगी देण्यात आली. तसेच भटवाडी येथील फरसांचे व्यापारी सुनील नाईक यांनी त्यांचे वडील कै. बाळकृष्ण विठ्ठल नाईक यांच्या स्मरणार्थ २० हजार रुपयांची देणगी दिली.
ही देणगी सामाजिक कार्यकर्ते उदय अळवणी यांच्या हस्ते सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष संजय पेडणेकर यांच्याकडे सुपूर्त करण्यात आली. संस्थेकडून दात्यांचा आभारपत्र देऊन सन्मान करण्यात आला.
यावेळी संजय पेडणेकर, शामराव हळदणकर, शेखर सुभेदार, लक्ष्मण कदम व रवी जाधव उपस्थित होते. या सेवाभावी उपक्रमासाठी मदत करणाऱ्या सर्व दात्यांचे संस्थेचे अध्यक्ष प्रा. सतीश बागवे यांनी मनःपूर्वक आभार मानले.
