श्रीराम नवमी निमित्त बांदा-पानवळ येथे भव्य धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन…

⚡बांदा ता.२३-: बांदा-पानवळ येथील श्रीराम पंचायतन मंदिर येथे गुरुवार दिनांक २६ रोजी श्रीराम नवमी उत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या उत्सवाचा लाभ भाविकांनी मोठ्या संख्येने घ्यावा, असे आवाहन प.पू. रघुवीर महाराज यांनी केले आहे.
उत्सवाची सुरुवात सकाळी ९ वाजता श्रीराम पूजन व अभिषेकाने होणार असून, सकाळी ९.३० ते १० या वेळेत श्रीराम जप करण्यात येणार आहे. सकाळी १० ते दुपारी १२ या वेळेत ह.भ.प. सदाशिव पाटील (आंदुले, कुडाळ) यांचे रामजन्मोत्सवाचे कीर्तन होणार आहे.
दुपारी १२ ते १ या वेळेत सामूहिक श्रीरामरक्षा व श्रीराम जप आयोजित करण्यात आला आहे. त्यानंतर दुपारी १ ते ३ या वेळेत महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
दुपारी १.३० ते २.३० या वेळेत ‘कृपा त्या माऊलीची’ प्रासादिक भजन मंडळ, मडुरा यांचे भजन सादर होणार असून, दुपारी ३ ते ५ या वेळेत प.पू. भक्तराज महाराज बिरचित भजने सादर करण्यात येणार आहेत. सायंकाळी ५ ते ६ या वेळेत अभिनव संगीत रजनी, माठेवाडी (सावंतवाडी) यांचा कार्यक्रम होणार असून, सायंकाळी ६ ते ९ या वेळेत शेखर पणशिकर आणि सहकारी यांच्याकडून गीतरामायण सादर करण्यात येणार आहे.
या सर्व कार्यक्रमांत भाविकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून श्रीराम नामस्मरणाचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page