श्री देवी दिर्बादेवी मंदिराचा भूमिपूजन व जीर्णोद्धार सोहळा 24 मार्चला…

⚡सावंतवाडी ता.२३-:
कोलगाव येथे श्री देवी दिर्बादेवी मंदिराच्या भूमिपूजन व जीर्णोद्धार सोहळ्याचे आयोजन मंगळवार दिनांक २४ मार्च २०२६ रोजी सकाळी १०.३० वाजता करण्यात आले आहे. या सोहळ्यास गावातील ग्रामस्थ, मानकरी, भक्तगण तसेच परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.
या कार्यक्रमामुळे मंदिराच्या जीर्णोद्धाराला नवे रूप प्राप्त होणार असून धार्मिक व सांस्कृतिक परंपरेला अधिक बळकटी मिळणार आहे. उपस्थित राहून सोहळ्याची शोभा वाढवावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
या सोहळ्याचे अध्यक्ष म्हणून श्री रामनाथ शामराव बावकर, सचिव श्री लक्ष्मण महादेव सावंत तसेच खजिनदार श्री न्हानु शिवराम करमळकर हे कार्यभार सांभाळत आहेत.
समस्त कोलगाव ग्रामस्थ, मानकरी, माहेरवाशिणी तसेच श्री देव चव्हाटा व श्री दिर्बादेवी देवस्थान समिती यांच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page