कणकवली : जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालयांतर्गत अभय केंद्र कणकवली यांच्या वतीने १२ मार्च रोजी ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ या अभियानाअंतर्गत जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या निमित्ताने पंचायत समिती कणकवली येथून भव्य बाईक रॅली काढण्यात आली.
या रॅलीत गटविकास अधिकारी अरुण चव्हाण, मनीषा देसाई, बालविकास प्रकल्प अधिकारी स्नेहा सामंत, सर्व मुख्य सेविका, पंचायत समितीचे कर्मचारी, कणकवली पोलीस कर्मचारी तसेच तालुक्यातील अंगणवाडी सेविका व मदतनीस मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. तसेच जिल्हा महिला व बालविकास विभागांतर्गत अभय केंद्र कणकवलीचे कर्मचारीही उपस्थित होते.
‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ या थीमवर आधारित ही रॅली पंचायत समिती कणकवली येथून सुरू होऊन कणकवली बसस्थानक मार्गे पुन्हा पंचायत समिती येथे परतली. या कार्यक्रमाला सभापती हर्षदा वाळके व उपसभापती राजेश उर्फ सोनू सावंत यांचे मार्गदर्शन लाभले.
